धुळे – Dhule – प्रतिनिधी :
काँग्रेसला शतकोत्तर परंपरा आहे. देशातील अगदी तळागाळापर्यंत काम करणार्या कार्यकर्त्यांची फळी या पक्षात आहे.
आगामी काळात पक्षाला अशाच निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज असल्याचे मत प्रदेश सरचिटणीस मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केले.
श्री.हुसेन हे आज जिल्हा दौर्यावर होते. सकाळी साक्री तालुक्याची बैठक आटोपून दुपार नंतर शिंदखेडा तालुक्याची आढावा बैठक घेतली.
या आढावा बैठकीत माजी राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख, धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्याम सानेर, शिंदखेडा तालुका अध्यक्ष रावसाहेब पवार, महिला तालुकाध्यक्षा सौ.छाया पवार, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष बापू महाजन, शिंदखेडा नगरपंचायतचे विरोधीपक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक दीपक अहिरे, जिल्हा सरचिटणीस डॉ.दरबारसिंह गिरासे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, जि.प. सदस्य हेमराज पाटील, सभापती शामकांत पाटील, सभापती किशोर पाटील, डॉ.जे.पी. बोरसे, उदय देसले, पांडुरंग माळी, शिवाजी पाटील, आबा मुंडे, भाईदास निळे, दिलीप साळुंखे, प्रविण पवार, नरेंद्र पाटील, विशाल पवार, पढंरिनाथ सिसोदे, पंजाब पाटील, महेंद्र पाटील, किशोर बागल, सुनिल गागरे, भगत धनगर, आशिष बागल महेंद्र देसले, नितीन मोरे, पावबा कोळी, कुलदीप निकम, राकेश राजपुत, भैय्या माळी, विलास गोसावी, सचिन पवार, समद शेख, रोहित पाटील मोहसीन शेख यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.