धुळे – प्रतिनिधी dhule
येथील अवधान एमआयडीसी कार्यालयात ओळख असुन कार्यालयातुन बांधकाम मंजुरीचे काम करुन देतो, असे म्हणत 25 हजारांची लाच घेणाऱ्या सल्लागार अभियंत्याला धुळे येथे एसीबीच्या पथकाने रंगहात पकडले. अहमद वफा अहमद हसन अन्सारी असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे येथील रहिवासी तक्रारदार यांनी अवधान एम.आय.डी.सी. येथील भुखंडावर अतिरिक्त बांधकाम करण्याकरीता नकाशा मंजुर होण्यासाठी दि ७ जून रोजी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन ऑनलाईन अर्ज सादर केला होता. त्याकरीता चलनाव्दारे आवश्यक ती फी देखील भरलेली होती.
मात्र बराच कालावधी होवुन देखील त्यांचा अतिरिक्त बांधकामाचा नकाशा मंजुर न झाल्याने तक्रारदार हे आज दि.६ रोजी कार्यकारी अभियंता यांच्या
कार्यालयाजवळ गेलो असता तेथे सल्लागार अभियंता अहमद वफा अहमद हसन अन्सारी यांच्याशी त्यांची भेट झाली. तेव्हा सल्लागार अभियंता अहमद वफा यांनी तक्रारदार यांना त्यांची एम.आय.डी.सी कार्यालयात ओळख असुन त्यांचे सदर कार्यालयातुन बांधकाम मंजुरीचे काम करुन देतो, असे म्हणत त्याकरीता २५ हजार रुपये दयावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने सल्लागार अभियंता अहमद वफा अहमद हसन अन्सारी यांचे विरुध्द लाच मागणी केल्याची धुळे एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीच्या पडताळणी दरम्यान सल्लागार अभियंता अहमद वफा अहमद हसन अन्सारी यांनी तक्रारदार यांच्याकडे अतिरिक्त बांधकाम मंजुरीचा नकाशा अवधान एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता, कार्यालयातुन मंजुर करुन देण्यासाठी २५ हजारांची लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम कार्यालयाजवळ स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, मंजितसिंग चव्हाण, रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, शरद काटके, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.