धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 212 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यात राज्य राखीव पोलिस दल, कृषी महाविद्यालय, मलेरिया ऑफिस, एसपीडीएम कॉलेज, बालाजी मंदिर, चिंचखेडा ग्रामपंचायत, आमळी प्राथमिक आरोग्य केंद्र, स्टेट बँक निमगुळ शाखेतील प्रत्येक एका रूग्णाचा समावेश आहे.
बाधितांची एकुण संख्या 15 हजार 217 वर पोहोचली आहे.
जिल्हा रुग्णालयातील 166 अहवालांपैकी 68 अहवाल, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 152 अहवालांपैकी शिरपूरातील 17, रॅपीड टेस्टच्या 73 पैकी 24, रेपिड स्टेट 5, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 59 अहवालांपैकी 5 व रॅपीड अँटीजन टेस्टच्या 25 पैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदखेडा येथील रॅपीड अँटीजन टेस्टच्या 34 पैकी 23, प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुक्यातील रॅपिड टेस्टच्या 124 पैकी 6, मनपा रॅपिड अँटीजन टेस्टच्या 262 पैकी 17, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 60 पैकी 6 एसीपीपीएम लॅबमधील 3 पैकी 2 व खाजगी लॅबमधील 64 पैकी 33 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.