धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात करोनामुळे एका वृध्देचा मृत्यू झाला असून गुरुवारी नव्याने 42 रुग्ण आढळले आहे. तर जिल्हा कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
जिल्हा रुग्णालयातील सात, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील सात, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील एक, भाडणे साक्री सीसीसीमधील तीन, महापालिका पॉलिटेक्निकमधील तीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एक तर खासगी लॅबमधील 19 असे एकूण 42 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शहरातील कनोसा शाळेतील चाळीसगाव रोडवरील 65 वर्षीय महिला उपचार घेत होती. तिचा उपचार घेतांना आज मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 355 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 158 तर ग्रामीण भागात 197 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 11 हजार 903 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.