धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 87 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 55 वर्षीय पुरुषाचा (भाटपुरा ता. शिरपूर) कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 12 हजार 510 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयातील येथील 72 अहवालांपैकी 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 109 अहवालांपैकी 9, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 66 अहवालांपैकी 14, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 92 अहवालांपैकी 6, महापालिका पॉलिकेक्निकमधील 36 अहवालांपैकी 3, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 10 अहवालांपैकी 3 व खाजगी लॅबमधील 104 अहवालापैकी 31 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
तसेच खाजगी लॅबमधील 26 पैकी 8 व मनपा पॉलिटेक्नीकमधील अॅटीजन टेस्टच्या 7 अहवालांपैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हा आतापर्यंत एकूण 365 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात मनपा हद्दीत 162 तर ग्रामीणमध्ये 203 जणांचा समावेश आहे.