Friday, May 3, 2024
Homeधुळेजिल्ह्यात 6 हजार 727 बाधित

जिल्ह्यात 6 हजार 727 बाधित

धुळे -प्रतिनिधी- Dhule

जिल्ह्यात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज नव्याने 210 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत सहा हजार 727 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

- Advertisement -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार घेणार्‍या 64 वर्षीय महिला, शर्मा नगर चितोड रोड, 66 वर्षीय पुरुष साक्री रोड धुळे, 79 वर्षीय पुरुष राऊळवाडी चितोड रोड धुळे, 43 वर्षीय पुरुष श्रीराम नगर धुळे तसेच 80 वर्षीय महिला कृषी नगर साक्री रोड धुळे यांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात 205 जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 99 तर ग्रामीण भागात 106 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालय येथील 118 अहवालांपैकी 55 अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 111 अहवालांपैकी 53 अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.

शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 65 अहवालांपैकी 36 अहवाल पॉजीटिव्ह आले असून महापालिका पॉलिकेक्निक मधील 76 अहवालांपैकी 15 अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. खाजगी लॅब मधील 103 अहवालापैकी 51 अहवाल पॉजीटिव्ह आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या