Saturday, May 4, 2024
Homeधुळेधुळ्यात दोघा वकीलांसह सात जणांवर गुन्हा

धुळ्यात दोघा वकीलांसह सात जणांवर गुन्हा

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

हक्काचे पैसे मागणार्‍या ठेवीदारांना खंडणी मागत असल्याचे दर्शविणारे वृत्त वृत्तपत्रात व इलेक्ट्रानिक्स मीडियावर प्रसारीत करून बदनामी केल्याप्रकरणी अ‍ॅड. किरण कुमावत यांच्यासह चौघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत उदय तोताराम वानखेडकर (वय 50 रा. साक्री रोड, धुळे) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. 18 व 25 जानेवारी रोजी ई बिझनेस ट्रेड अ‍ॅण्ड सर्व्हीसेस, धुळे कंपनीचे चालक मालक व संचालक अ‍ॅड. किरण कुमावत, सौ. राखी किरण कुमावत, अशोक काशिनाथ सोनवणे व सौ. आशा अशोक सोनवणे (रा. धुळे) यांनी या कंपनीतील ठेवीदार मी व सोबतच्या ठेवीदारांची बदनामी होईल म्हणून वृत्तपत्र व न्युज चॅनलवर आम्ही जास्तीचे पैसे उकळण्यासाठी खोट्या तक्रारी करीत आहे, अशी बातमी प्रसारीत करून समाजात बदनामी केली. त्यावरून वरील चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेकाँ राठोड चौकशी करीत आहेत.

अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव यांच्यासह चौघांवर गुन्हा

वकीलाचा अजबफंडा घातला करोडोचा गंडा, अशा मथळ्याखाली वृत्रपत्रांमध्ये बातमी प्रसारीत करून बदनामी केल्याप्रकरणी अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत किरण धनराज कुमावत (रा. वलवाडी शिवार, धुळे) यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, उदय तोताराम वानखेडकर, रेखा उदय वानखेडकर रा. पत्रकार कॉलनी, धुळे, मोहोज्जम शेख नजीम मोहद्दीन रा. गरिबनवाज कॉलनी, शहादा व अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव यांनी दि. 1 व 11 जानेवारी रोजी वृत्तपत्रांमध्ये वकीलाचा अजब फंडा घातला करोडोचा गंडा, अशा मथळ्याखाली बातमी प्रसारीत करून बदनामी केली.

त्यावरून वरील चौघांवर पश्चिम देवपूर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. चौकशी पोना ठाकुर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या