Friday, May 3, 2024
Homeधुळेगावठी कट्टा विक्रीसाठी आलेला तरूण ताब्यात

गावठी कट्टा विक्रीसाठी आलेला तरूण ताब्यात

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील नगावबारी परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने

- Advertisement -

सापळा रचत शिताफिने पकडले. त्यांच्याकडून 25 हजारांचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील एक तरूण गावठी बनावटीचा कट्टा बाळगून असून तो त्या कट्टयाची विक्री करण्यासाठी धुळ्यातील साईकिशन हॉटेल, नगावबारी परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या पथकाने आज सायंकाळी नगावबारीतील साईकिशन हॉटेल परिसरात सापळा लावून शिताफीने एकास पकडले. कुणास नंदूरगडे (फुलेनगर, शिंगावे ता. शिरपूर) असे त्याने त्याचे नाव सांगितले.

त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 25 हजार रूपये किंमतीचा एक गावठी बनावटीची पिस्टल/कट्टा मिळून आला. त्यांच्याविरूध्द पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक हनुमान उगले, पोहेकॉ. रफीक पठाण, श्रीकांत पाटील, पोना प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप व कैलास महाजन यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या