Saturday, May 4, 2024
Homeधुळेपैसे मागितल्याच्या रागातून एकाचा खून

पैसे मागितल्याच्या रागातून एकाचा खून

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील टेंभे येथे ऊसतोड मजुरीचे दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांवर निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

सुखराम शिवा मोगरे (रा. टेंभे ता. साक्री) असे मयताचे नाव आहे. त्यांनी दादाजी खंडु देसले (रा. टेंभे) व वन्या (रा. डोंगराळ ता. साक्री) यांना ऊसतोड मजुरीचे चाळीस हजार रूपये दिले होते.

मात्र दोघे मजुरीच्या कामास जात नव्हते. त्यामुळे सुखराम हे त्यांच्याकडे पैसे परत मागण्याकरीत जात होते. पंरतू त्यांनी पैसे परत केले नव्हते.

पैसे मागितल्याच्या राग येवून दोघांनी सुखराम मोरे यांचा खून केला. ही घटना दि. 12 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास टेंभे गावातील धरणावर घडली.

अशी फिर्याद मयताची पत्नी सोनी सुखराम मोगरे यांनी निजामपूर पोलिसात दिली आहे. त्यानुसार दादाजी देसले व वन्या (पुर्ण नाव गाव माहिती नाही) या दोघांविरूध्द भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघे फरार असून पोलिस त्याच शोध घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या