धुळे dhule
धुळे- दादर (मुंबई) दरम्यान सुरू करण्यात (Dhule-Dadar (Mumbai) train) आलेल्या नवीन त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री (Raosaheb Danve, Minister of State for Central Railway) रावसाहेब दानवे यांनी आज सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा (green flag) दाखवून शुभारंभ (launch) केला.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार उन्मेश पाटील हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते. यानिमित्त धुळे रेल्वे स्थानकावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खासदार डॉ. सुभाष भामरे, धुळ्याच्या महापौर प्रतिभा चौधरी, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे व्यवस्थापक डी. एस. केडिया, कौशलकुमार, डॉ. शिवराज मानसपुरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार, अनुप अग्रवाल आदींसह लोकप्रतिनिधी, रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. ही गाडी आठवड्यातून सोमवार, मंगळवार आणि शनिवार असे तीन दिवस धुळे येथून धावणार आहे. तर
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, धुळे ते दादर रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी होती. त्यासाठी खासदार डॉ. भामरे, खासदार उन्मेश पाटील यांच्यासह या भागातील सर्व लोकप्रतिनिधींनी आग्रह धरलेला होता. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार आजपासून ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. प्रवासी संख्या वाढली, तर आठवडाभर ही रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, धुळे-दादर रेल्वे सेवेमुळे दळण- वळणाच्या सुविधा वाढणार असून नागरिकांना प्रवासाची सुविधा निर्माण झाली आहे. या रेल्वे सेवेचा सर्वांनाच लाभ होणार आहे. खासदार डॉ. भामरे म्हणाले की, धुळे येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यासाठी विशेष गाडी सुरू करावी, अशी मागणी होती. त्यानुसार आजपासून प्रायोगिक तत्वा्रवर ही गाडी धावणार आहे. या गाडीला धुळेकरांनी प्रतिसाद द्यावा, असेही आवाहनही त्यांनी केले. खासदार उन्मेष पाटील, महापौर श्रीमती चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लोकप्रतिनिधी, रेल्वेचे अधिकारी, नागरिक, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचोरा-जामनेर या नॅरो गेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सेवा जागतिक दर्जाची करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखालील केंद्र सरकार महाराष्ट्रासाठी 13 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वेचे विविध प्रश्न मार्गी लागतील. धुळे-नरडाणा रेल्वे मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. त्याचा पुढील टप्पा इंदूरपर्यंतचा असेल. सन 2023 पर्यंत रेल्वेच्या सर्व मार्गांचा विद्युतीकरणाचा निर्धार करण्यात आला आहे. याबरोबरच देशातील 1 हजार 250 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. तेथे विविध अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.