धुळे । प्रतिनिधी dhule
शहरातील देवपूर भागातील तरूणाची ऑनलाईन (online) पध्दतीने 85 हजारात फसवणूक (Fraud) करण्यात आली. तर इतरांनाही गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी इवा व रॉबर्ड नामक व्यक्तींवर पश्चिम देवपूर पोलिसात (police) गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत रूपेश सतिष काळे (वय 34 रा.गुलाब पुष्प बंगला, घर नं. 27, सुर्यास्तमुखी हनुमान मंदिराच्या बाजुला, शारदा नेत्रालयाजवळ, जितेंद्र नगर, देवपूर) याने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दि. 30 मार्च रोजी रात्री आठ वाजता इवा नामक मुलीच्या मोबाईल क्रमांकावरून मॅसेज प्राप्त झाला. त्यात माझे नाव इवा असून मी एक क्रिप्टोकरंन्सीव ब्रोकर असून मी युवान स्पेसएक्स नावाच्या कंपनीमध्ये काम करीत असून कंपनी ही हाँगकाँग या देशात कार्यरत आहे.
तर कंपनीचा मायनिंग पुल हा कझाकिस्तान या देशात असल्याचे म्हटले होते. तर रॉबर्ट नावाच्या व्यक्तीने त्यांच्या व्हॉट्स अॅप व फेसबुकच्या माध्यमातून ते कझाकिस्तान या देशातील इक्युटी या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासविले. त्याव्दारे गुंतवणुकीव्दारे मोठा परतावा देण्याचे आमिष दाखविले. तसेच गुंतवणुकदारांनी त्रास द्यावा, या उद्ेशाने रूपेश याच्या नावाचे बनावट प्रतिनिधी असल्याचे प्रमाणपत्र तयार करून ते व्हॉट्सअॅपवर प्रसारीत केले. त्याव्दारे त्याची 85 हजार रूपयात तसेच इतरांची फसवणूक केली.