Friday, May 17, 2024
Homeधुळेडायल 112 सेवेत धुळे राज्यात दुसर्‍या स्थानी, विभागात अव्वल

डायल 112 सेवेत धुळे राज्यात दुसर्‍या स्थानी, विभागात अव्वल

धुळे । प्रतिनिधी

महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम अर्थात डायल 112 या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी याकरीता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. परिणामी, पीडित व्यक्ती मदत पोहचविण्याचा 15.51 मिनीटांचा रिस्पॉन्स टाईम अवघ्या 3.26 मिनीटांवर आला आहे. त्यामुळे धुळे जिल्हा महाराष्ट्रात दुसर्‍या तर नाशिक परिक्षेत्रात अव्वलस्थान कायम ठेवले आहे.

- Advertisement -

अशी मिळते मदत – एखादी व्यक्ती त्याला मदत मिळण्यासाठी डायल 112 यावर संपर्क साधते. हा क्रमांक प्राथमिक संपर्क केंद्र, मुंबई अथवा द्वितीय संपर्क केंद्र, नागपूर यांचेशी जुळला जातो. त्यानंतर तो कॉल धुळे जिल्हा घटकाचे डायल 112 नियंत्रण कक्ष येथील डिस्पॅचर यांचेकडे वर्ग केला जातो. डिस्पॅचर हे हा कॉल पीडित व्यक्तीच्या पोलीस स्टेशन स्तरावरील ईआरव्ही, एमडीटी डिव्हाईसवर पाठवितात. या ठिकाणी कॉल प्राप्त होताच कर्तव्यावर हजर कर्मचारी तो कॉल पाहुन निर्धारीत वेळेत पीडितास मदत करतात.

शेवट्याच्या क्रमांकावरून थेट दुसर्‍यास्थानी
डायल 112 साठी धुळे नियंत्रण कक्षात पाच अत्याधुनिक कॉम्प्युटर सिस्टम व एक सुपरवायझर सिस्टम कार्यान्वित आहे. तर जिल्हाभरात 35 चारचाकी व 34 दुचाकी वाहने कार्यरत असून या वाहनांवर एमडीडी टॅब बसविण्यात आले आहे. या कार्यप्रणालीवर पोलीस अधीक्षकांचे नियंत्रण आहे. जानेवारी -2024 मध्ये पीडित व्यक्तीस मदत पोहचविण्याचा कालावधी हा 15.51 मिनिटे इतका होता. त्यामुळे राज्यातील एकूण 45 घटकांपैकी शेवटच्या क्रमांकावर धुळे जिल्ह्याचा नंबर होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यात सुधारणा होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केल्याने फेबु्रवारी महिन्यात 10.35 मिनिटे एवढा रिस्पॉन्स टाईम होता. तेव्हा धुळे जिल्हा राज्यात 40 व्या स्थानी होता. यात अधिक सुधारणा व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रभारी अधिकारी सपोनि विलास ताटीकोंडलवार यांना सुचना व मार्गदर्शन केले. परिणामी, एप्रिल 2024 मध्ये 3.26 एवढा रिस्पॉन्स कालावधीची नोंद करण्यात आली. त्यामुळे एवढ्या कमी वेळेत थेट पीडितास तात्काळ मदत पोहचविणारा राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा जिल्हा म्हणून नामांकन प्राप्त झाले असून नाशिक परिक्षेत्रात धुळे जिल्हा हा अव्वल स्थानी कायम आहे.

पोलीस अधीक्षकांसह पथकाच्या प्रयत्नांना यश
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डायल 112 कार्यप्रणालीचे प्रभारी अधिकारी, सपोनि विलास ताटिकोंडलवार, मे.महिंद्रा डिफेन्सचे अभियंता योगेश कापडे, तुषार सोनवणे, डायल 112 चे डिस्पॅचर पोहेकॉ वाघ, श्री.खलाणे, श्री.निकुंभे, महिला पोहेकॉ भोई, वाघ, पोना बोरसे, महिला पोकॉ शेंडगे, चौधरी व सर्व पोलीस स्टेशनच्या प्रतिसादकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या