Wednesday, March 26, 2025
Homeधुळेकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

कोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

धुळे –

कोराना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपायासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आज नवीन चार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन दुबई व सौदी अरेबिया येथून तर अन्य दोघे मुंबई आले असल्याची माहिती देण्यात आली.

- Advertisement -

विशेष म्हणजे यापुर्वी पाठविलेल्या आठ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त केला. अधिष्ठाता डॉ.नागसेन रामराजे, अधीक्षक डॉ.राजकुमार सूर्यवंशी यांच्यासह सर्वच विभागप्रमुख अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच एका स्वतंत्र इमारतीत फ्ल्यू ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण विभाग तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. तीन दिवसात तब्बल दीड हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.

आज साडेतीनशे रुग्णाची तपासणी झाली. यात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची तपासणी करुन घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. पुढील 21 दिवस त्यांनी घराबाहेर पडू नये असे सांगत त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. तर तपासणी झालेल्या दोघांना दाखल करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshumukh Case: “आडवे आले तर कायमचा धडा शिकवा”; संतोष देशमुख...

0
बीड | Beedसंतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहिले. उज्वल निकम हे...