Sunday, November 17, 2024
Homeमुख्य बातम्यासरकारी पगार घेणारे गृह खात्यातील ‘खबरे’ कोण ?

सरकारी पगार घेणारे गृह खात्यातील ‘खबरे’ कोण ?

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

सुशांतसिंग प्रकरणी माजी आ.अनिल गोटे यांचा गौप्यस्फोट, मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार, पुराव्यासाठी दिली व्हिडीओ क्लिप

- Advertisement -

अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी भाजपचे काही नेते तसेच पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यासह काही जणांकडे अधिकची माहिती असूनही त्यांनी ती लपवून ठेवली, असे सांगत या नेत्यांसह सरकारी पगार घेवून बाहेर खबरी पुरविणार्‍यांचा शोध घेत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आ.अनिल गोटे यांनी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रारीसह काही पुरावेही त्यांनी दिले आहेत.

श्री.गोटे यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, सुशांतसिंग याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय तपास करीत आहे. मात्र तपास यंत्रणेपेक्षा आपल्याकडे अधिक माहिती असल्यासारखे आ.राम कदम, खा.नारायण राणे, माजी खा.निलेश राणे, आ.नितेश राणे, पत्रकार अर्णव गोस्वामी, आ.आशिष शेलार, आ.अतुल भातखळकर हे बोलत आहेत.

यापैकी काहींनी प्रसार माध्यमांसमोर तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यांच्याकडे एव्हढीच माहिती असेल तर ती आजपर्यंत का लपवून ठेवली. असा सवाल करीत यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करीत, तपासासाठी त्यांचा उपयोग करुन घ्यावा अशी मागणी श्री.गोटे यांनी केली आहे.

पत्रकार अर्णव गोस्वामी हे तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काही उच्च पदस्थ अधिकार्‍यांबद्दल एकेरी व खालच्या पातळीवर बोलत आहेत. आपली माणसे मंत्रालयात, गृहखात्यात असल्याचे सांगुन आपल्याला प्रत्येक मिनिटाची इत्यंभूत माहिती मिळत असल्याचा दावा करीत आहेत.

त्यामुळे सरकारी पगार घेवून त्यांना माहिती पुरविणारे खबरे शोधायला हवेत. मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग होत असल्याने संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल करायला हवेत. कारण मुंबई महानगरातील कायदा सुव्यवस्टा अबाधीत ठेवण्याची सर्वस्वी जाबाबदारी मुंबई आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांची आहे. अशा असामाजीक व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तत्वांवर वचक न राहिल्यास अंदाधुंद माजून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यताही श्री.गोटे यांनी व्यक्त केली आहे.

माफियांशी संबंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवणावर चित्रपट बनविणारा निर्माता संदीपसिंग याचे सुशांतसिंग सोबत अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. तर संदीपसिंग याचे ड्रग्ज माफियांशी संबंध आहे. तिथपर्यंत तपास यंत्रणा पोहचली आहे. याचा अर्थ पंतप्रधानांवर चित्रपट बनविणारा ड्रग्ज माफिया असेल तर पंतप्रधान तरी सुरक्षित आहेत काय? असा गंभीर सवाल श्री. गोटे यांनी या तक्रारीत केला आहे.

भाजपाचे आ.राम कदम यांनी नुकताच एका चॅनलला एक व्हिडीओ दिला. यामुळे सुशांतसिंग प्रकरणाला कलाटनी मिळाली आहे. सुशांतसिंगचे ड्रग्ज माफिया खत्री सोबत संबंध असल्याचा हा व्हिडीओ सन 2017 मधील आहे. त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांच्याच पक्षाच्या आ.कदम यांनी त्यांना ही माहिती दिली होती का? दिली असेल तर काय कारवाई झाली?

इंतियाज खत्रीवर नेमका कुणाचा वरदहस्त आहे? ही गंभीर माहिती पोलिसांपासून का लपविण्यात आली? या सार्‍याच प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. सुशांतसिंग प्रकरणाच्या निमित्ताने ड्रग्ज माफिया आणि त्यांचे राजकारण्यांशी असलेले संबंध याचेही चौकशी होणे आवश्यक असल्याचे श्री.गोटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या