Wednesday, May 29, 2024
HomeUncategorizedधुळे : एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू

धुळे : एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू

मृतात पती-पत्नीसह दोन मुलींचा समावेश; बिजासनी घाटातील घटना; तीन गंभीर

धुळे – 

मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासनी घाटात सेंधव्याकडून येणार्‍या तेलाचा टँकर ब्रेक नादुरुस्त दुभाजक तोडून विरुध्द दिशेला घसरुन उलटला. त्याच दरम्यान शिरपूरकडून सेंधव्याला दुचाकीने जाणारे एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह दोन चिमुकले त्याखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडला.

- Advertisement -

मध्यप्रदेशातील सेंधव्याकडून तेल भरुन टँकर मुंबई-आग्रा महामार्गाने येत असतांना बिजासनी घाटात टँकरचा ब्रेक अचानक नादुरुस्त झाला. त्यात टँकर उतरतीवर असल्यामुळे चालकाला वाहनावर नियंत्रण मिळविणे कठीण झाले. त्यामुळे टँकर महामार्गावरील दुभाजक तोडून विरुध्ददिशेला जावून आदळला. त्याचवेळी दोंदवाडीपाडा-पनाखेड, (ता. शिरपूर) येथील सासरी आलेला कमल भीमसिंग पटेल (वय 38, रा. साकड, सेंधवा) हा मोटारसायकलीवरुन पत्नीसह चार मुलांना घेवून जात असतांना काही कळण्याच्या आतच त्या टँकरखाली दबला गेला. त्यात मोटारसायक चालक कमल, पत्नी नुरमाबाई (वय35), मुलगी गौरी (वय 2), गुडीया (वय 1) या चौघांचा टँकरखाली दबून जागीच मृत्यू झाला. तर कमलची दोन वर्षाची मुलगी गुंंजा व तीन महिन्याची मुलगी रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्यामुळे दोघी अपघातातून बचावल्या. जखमींना उचारासाठी सेंधवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मयत पावरा कुटुंब हे साकड-सेंधवा गावी जाण्यासाठी निघाले होते. या अपघातात टँकर चालक व सहचालक देखील गंभीर जखमी झाले आहेत.

टँकर दुभाजकावर धडकल्यामुळे तो फुटला. त्यामुळे रस्त्यावर तेलच तेल झाले होते. घटनास्थळी सेंधवा पोलिसांचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी पडलेले टँकर बाजूला करण्यात आले. मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर प्रांताधिकारी घनश्याम धनगर यांनी मृतदेह मयताच्या गावी घेवून जाण्यासाठी व्यवस्था केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या