Saturday, November 23, 2024
Homeधुळेधुळे येथे मराठा समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

धुळे येथे मराठा समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

मेळाव्याला खान्देश, मुंबई, पुणे, औरंगाबाद, 

गुजरात, मध्यप्रदेशातून सुमारे ५०० वधू-वर परिचयासाठी येणार आहेत

धुळे –

येथे दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खान्देशातील मराठा पाटील समाजाचा राज्यस्तरीय वधू वर व पालक परिचय मेळावा आयोजीत केला आहे.

- Advertisement -

सदर मेळावा- संतोषी माता चौक ,शिवतीर्था जवळ सैनिक लॉन्स येथे होणार आहे. आयोजक संतोष सूर्यवंशी यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वदूर संपर्क दौरा सुरू केला आहे.

त्यासाठी पाहणी परिचयातुन मेळाव्यातच ५० ते ६० विवाह मार्गी लागतील असा आयोजकांचा प्रयत्न आहे.

वधू-वर सूची पुस्तिका प्रकाशित होणार

या मेळाव्यात नाव नोंदणी झालेल्या ८०० वधू वर सूची पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. ती पुस्तिका पालकांना विवाह जमवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

मेळाव्यात हुंडा, कुंडली, गुण, मंगळ यावर मान्यवर समाजाला प्रबोधन करणार आहेत.

सुचि पुस्तिकेत जास्त नावे होण्यासाठी रंगराव पाटील, एस.के.पाटील, अशोक वाघ, काशिनाथ बोढरे (धुळे), नाना रामा पाटील, जिजाबराव पाटील (एरंडोल), गणेश अहिरराव, प्रकाश पाटील, जे.एन.पाटील (जळगाव), सुभाष सूर्यवंशी (चोपडा) प्रमोद यशवंत निकम, दिगंबर निकम (नासिक), बी.डी.पाटील जे.डी.पाटील (शिरपूर), अशोक पाटील (शिंदखेडा), भास्कर नगराज पाटील, महेंद्र पाटील (नंदुरबार), संजय पाटील, चंद्रशेखर पाटील (दोंडाईचा), नम्रता पाटील आर.जी.पाटील (पाचोरा) तंगाराम पाटील, रमेश हरी पाटील (चाळीसगाव) हे विशेष प्रयत्न करीत आहेत.

या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन –

संतोष सुर्यवंशी – (मोबाइल नं.9423703581/9326007774) यांनी केले आहे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या