धुळे । dhule प्रतिनिधी
गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांनी आपल्या कारकिर्तीत विविध गायकांसोबत गायलेली निवडक एक हजार युगल गीते सादर करुन विश्वविक्रम (world record) करण्याचा संकल्प प्रख्यात गायक पारिजात चव्हाण आणि डॉ. गायत्री चव्हाण (Parijat and Dr. Gayatri Chavan) यांनी आज जाहीर केला. लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांनी ही घोषणा केली.
बोरखेडच्या ‘या’ बहुचर्चित खुन प्रकरणात दोषारोपपत्र दाखल
शहरातील बर्वे स्मृती छात्रालयात लतादिदींना स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कवी जगदीश देवपूरकर, शाहीर श्रावण वाणी, पारिजात चव्हाण, डॉ. गायत्री चव्हाण, सुनिल पाटील, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
पारिजात व डॉ. गायत्री या दाम्पत्याने यापुर्वी 2015 मध्ये सलग 19 तास युगल गीत गाऊन लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे. आता 45 ते 50 तास सलग युगल गीते गाऊन विश्वविक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे. एप्रील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धुळे होणार्या या कार्यक्रमाला गिनीज ऑफ रेकॉर्ड, आशिया वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थांना आमंत्रित केले जाईल. यात महापालिका, जिल्हा परिषद, विविध शैक्षणिक संस्था आणि मिडीयालाही सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न राहिल.
नंदुरबार – वाका चार रस्त्यावर तिहेरी अपघात
लतादिदींनी आपल्या कारकिर्तीत मोहम्मद रफीक, किशोरकुमार, मन्ना डे, मुकेश, महेंद्र कपूर, अमीतकुमार, शैलेंद्रसिंग, तलत मेहमूद, सुरेश वाडकर, उदीत नारायण यांच्यासह सोनू निगम, हरीहरन, कुमार सानू यांच्यासोबत लाखो अजरामर गाणी गायीली आहेत त्यातली निवडक एक हजार युगल गीते सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पारिजात चव्हाण यांनी दिली.