Sunday, June 8, 2025
Homeधुळेधुळ्यात पोलिसाचे घर फोडले

धुळ्यात पोलिसाचे घर फोडले

धुळे  – 

- Advertisement -

शहरातील देवपूर परिसरात असलेल्या प्रभातनगरात हवालदाराचे घर चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा लाखोंचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील देवपूर परिसरात असलेल्या प्रभातनगरात प्लॉट नं. 149 मध्ये हवालदार रामचंद्र सोमा रोकडे हे राहतात. अज्ञात चोरट्याने त्यांचे घर फोडून पाच तोळे सोने, 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व 30 हजार रुपये रोख असा लाखोंचा मुद्देमाल चोरुन नेला.

श्री. रोकडे हे नंदुरबार येथील कारागृहात कार्यरत आहेत. याबाबत देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्याच घरी चोरी झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज-का-रण : कोण आहेत हो हे सुधाकर बडगुजर..?

0
शैलेंद्र तनपुरे [email protected] बडगुजर काही दिवसातच गिरीश महाजन यांच्या गळ्यातील ताईत बनलेले दिसतील आणि पुढील चार वर्षात भाजपचे विधानसभेचे उमेदवार झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. काळाचा महिमा...