Monday, March 31, 2025
Homeधुळेधुळे पोलिसांनी सिनेस्टाईल रोखली गुटखा तस्करी

धुळे पोलिसांनी सिनेस्टाईल रोखली गुटखा तस्करी

धुळे । प्रतिनिधी dhule

शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने साक्रीरोडवरील सुरेंद्र दुध डेअरी जवळ सापळा रचला. मात्र पथकाची चाहुल लागताच चालकाने कार सुसाट वेगाने पळविली. या कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून पकडण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आले. या कारवाईत 79 हजार 200 रूपये किंमतीचा गुटख्यासह एक लाख 40 हजार रूपये किंमतीची कार असा दोन लाख 19 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक आनंद कोकरे यांना सुरत बायपासकडून शहरात ऑरेंज रंगाच्या स्वीफ्ट कार क्र.एम. एच.18/टी.1253 मधून बेकायदेशिर गुटख्याची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने साक्रीरोडवरील सुरेंद्र दुध डेअरी जवळ दबा धरला.त्यावेळी सकाळी साडेसात वाजता वरील क्रमांकाचे संशयित वाहन हे त्या ठिकाणी आले. चालकाला पोलिसांची चाहुल लागताच त्याने कार सुसाट वेगाने सिंचन भवनाकडे नेली. या कारचा पथकाने सिंचन भवनपर्यत सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन अडविले. चालक नितेश प्रकाशलाल आहुजा रा.कुमारनगर, साक्री रोेड,धुळे यास ताब्यात घेण्यात आले. तसेच 79 हजार 200 रूपये किंमतीचा गुटख्यासह एक लाख 40 हजार रूपये किंमतीची कार मिळून दोन लाख 19 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ३१ मार्च २०२५ – मानसिकता बदलाची अजूनही प्रतीक्षाच

0
मुलींच्या शिक्षणातील अडथळे अजूनही थांबायला तयार नाहीत. देशाची क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार मुलींच्या शिक्षणाचा विशेष विचार केल्यास केंद्र सरकार सांगते. मुलींना...