Sunday, May 18, 2025
Homeधुळेधुळ्यात पुर्ववैमस्यातून तरूणावर कोयत्याने हल्ला

धुळ्यात पुर्ववैमस्यातून तरूणावर कोयत्याने हल्ला

धुळे । dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील हाजी चौकात (Haji Chowk) पुर्ववैमस्यातून (previous enmity) तरूणाला (young man) बेदम मारहाण (brutal beating) करून त्याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Fatal attack by coyote) करण्यात आला. त्यात तो गंभीर जखमी (seriously injured) झाला असून याप्रकरणी आठ जणांवर (eight people) गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

आरीफ खान मेहमुद खान (वय 34 रा. जामचा मळा, चाळीसगाव रोड, धुळे) असे जखमीचे नाव आहे. दि. 12 रोजी 9 वाजेच्या सुमारास वडजाई रोडवरील हाजी चौकात ही घटना घडली. मागील भांडणाची कुरापत काढून शरीफ शाह, रईस शाह, सईद शाह, मुन्नीचा मुलगा जाहिद, अबुबकर जाकीर मुल्ला, अल्तमश, बिलाल शहा सलीम शाह रा. काझी प्लॉट, वडजाई रोड व तौसीफ उर्फ जुनेद आरीफ शहा रा. जनता सोसायटी व इतर आठ ते दहा जणांनी जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदीचा आदेश सुरू असतांना हातात लाठ्या-काठ्या, कोयता घेवून हल्ला चढविला. हाताबुक्यांनी व काठ्यांनी मारून जखमी केले.

तर अबुबकर मुल्ला याने कोयत्याने उजव्या खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानुसार वरील 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय नासीर पठाण करीत आहे.

एपीआय संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बिलाल शहा, तौसिफ शहा यांना अटक केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात...