Tuesday, April 1, 2025
Homeधुळेधुळे : शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात १८८ अहवाल निगेटिव्ह

धुळे : शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात १८८ अहवाल निगेटिव्ह

धुळे – मागील आठवड्यात कोरोना बाधितांचा वाढलेला वेग रोखण्यात यंत्रणेला यश येत असून मंदावलेल्या आकडेवारीमुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात धुळे तालुक्यातील मुकटी येथील एका 75 वर्षीय वृध्दाला बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1153 झाली आहे.

हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह, जिल्हा रुग्णालय, शासकीय तंत्रनिकेतन, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय तर साक्रीतील रुग्णालयात स्वॅब घेणे सुरु आहे. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आज 188 अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले तर धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 34 पैकी 33 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत

- Advertisement -

. बाधितांची झपाट्याने वाढणारी संख्या कमी झाल्याचे बघून जिल्हा प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र बाधितांची संख्या घटत असली तरी कोरोना अद्याप पुर्णपणे गेलेला नाही. याची जाणीव ठेवून नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तोंडावर मास्क लावावा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 58 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 712 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बाधितांच्या तुलनेत बरे होणार्‍यांचे प्रमाण 50 टक्क्याहून अधिक आहे.

साक्रीत नोडल ऑफिसरवर गुन्हा

कोरोना बाधीतांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेवून त्याबाबत वेळोवेळी उपाययोजना करुन तसा अहवाल शासनाला पाठविणे आवश्यक असते. यासाठी साक्री शहरात नोडल ऑफिसर म्हणून डॉ. आर.व्ही.पाटील यांची तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी नियुक्ती केली आहे. मात्र डॉ. पाटील यांनी आपल्या कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने स्वत: तहसीलदार यांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

कोरोना व्हायरस कोणता? यंत्रणेलाच संशय

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना आणि आतापर्यंत 58 जणांचा कोरोनाने बळी घेतला असतांना काही जणांचे मृत्यू लक्षणे आढळल्यानंतर अवघ्या 24 तासात झाले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसचा स्ट्रेन (प्रकार) नेमका कोणता? असा प्रश्न आरोग्य यंत्रणेलाच पडला आहे. त्यामुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने तसे पत्र पुण्यातील लॅबला पाठवले आहेत. ‘एल’ आणि ‘एस’ अशा दोन प्रकारचा कोरोना व्हायरस असून धुळ्यातला प्रकार कोणता? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Fire News : फटाका कारखान्यात भीषण स्फोट; पाच जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची...

0
गुजरात | वृत्तसंस्था | Gujarat गुजरातच्या (Gujarat) बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात (Firecracker Factory) भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू...