Monday, April 28, 2025
Homeधुळेधुळ्यात धुमश्चक्री, एक जण ठार

धुळ्यात धुमश्चक्री, एक जण ठार

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई – आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्याजवळील मोहाडी पोलीस ठाण्याच्या जवळचं हाकेच्या अंतरावरती एका हॉटेलवर दोन गटात धुमश्चक्री उडाली. लाठ्या काठ्यांसह तलवारी व हत्यारांचा वापर झाला. यात एक जण ठार झाला. तर गावठी कट्ट्यातून गोळीबारही करण्यात आला.

- Advertisement -

आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन गट एकमेकांवर हत्यार घेऊन चालून आले. पूर्व वैमनश्यातून झालेल्या या वादामुळे मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात एक तरुण ठार असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पथक व मोहाडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ठार झालेल्या तरुणाच्या पार्थिवास सध्या शवविच्छेदन साठी पाठवण्यात आले असून हल्ला कोणी व कशासाठी केला याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

परंतु या गॅंगवार मुळे पुन्हा एकदा धुळ्यामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Neha Singh Rathore : पहलगाम हल्ल्यासंदर्भात ‘चिथावणीखोर’ पोस्ट; गायिका नेहा सिंग...

0
दिल्ली । Delhi प्रसिद्ध गायिका नेहा सिंग राठोड हिच्याविरुद्ध लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत...