धुळे – Dhule – प्रतिनिधी :
येथील राज्य राखीव दल बलगट क्र. 6 चे 29 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे जवान गडचिरोली येथे बंदोबस्तासाठी गेले होते. तर जिल्ह्यात आज 23 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
राज्य राखीव दलातील 150 जवानांची तुकडी 1 जुलैपासून गडचिरोली येथे बंदोबस्तासाठी गेली होती. तेथेच 28 जवानांना कोरोनाची बाधा झाली. तर इतर जवानांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. बाधीत जवानांवर पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. असे एसआरपीएफ कडून सांगण्यात आले.
23 अहवाल पॉझिटिव्ह
शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 54 अहवालांपैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात अहिल्यापूर येथील रुग्णाचा समावेश आहे.जिल्हा रुग्णालय येथील 37 अहवालांपैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात मोगलाई देशमुखवाडा तीन, चितोड एक, मेहेरगाव एक, अग्रवालनगर एक या रुग्णांचा समावेश आहे.
महापालिका पॉलिटेक्निक सीसीसी येथील 49 अहवालांपैकी सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात राऊळवाडी गणपती मंदीर एक, ग.नं.14 जुने धुळे दोन, वरखेडीरोड एक, मुक्ताईनगर एक, पाटकरनगर एक, वाडीभोकर रोड एक या रुग्णांचा समावेश आहे.
शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 35 अहवालांपैकी आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पाटीलवाडा एक, वाडी तीन, भोरखेडा एक, मांडळ दोन आणि वाघाडी एक रुग्णांचा समावेश आहे. धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 44 अहवालांपैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात जगदीशनगर मोगलाई येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1675 रुग्ण बाधीत झाले आहेत.
पोलीस अधिकारी बाधीत
धुळे शहर पोलीस ठाण्यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामुळे या अधिकार्याच्या संपर्कातील आलेल्यांना क्वारनटाईन करण्यात आले आहे.
कोरोना बाधीत वृध्देचा मृत्यू
धुळे येथील शासकीय महाविद्यालय येथे मोहाडी उपनगर येथील 65 वर्षीय कोरोना बाधीत वृध्दा उपचार घेत होती. त्या वृध्देचा आज सकाळी मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 79 जणांचे बळी घेतले आहेत. त्यात मनपा क्षेत्रात 39 तर ग्रामीण भागात 40 रुग्णांचा समावेश आहे.