Tuesday, May 28, 2024
Homeधुळेएसटी बस-दुचाकीचा अपघात ; पती पत्नी ठार

एसटी बस-दुचाकीचा अपघात ; पती पत्नी ठार

दोंडाईचा – श. प्र. Dhule

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील निमगूळहून (Dondaicha) दोंडाईचाकडे जातांना बस व दुचाकीचा अपघात झाला या अपघातात (Nandurbar) नंदुरबार ता.ओसर्ली येथील पती-पत्नी ठार झाल्याची घटना आज गुरुवार सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली.

- Advertisement -

निमगुळ दोंडाईचा रस्त्यावर निमगुळ गावापासून दोंडाईचा कडे जातांना नंदुरबार ता.ओसर्ली येथील रविंद्र मुकुंदर गिरासे वय 60 उजनबाई रविंद्र गिरासे वय 50 रा. ओसर्ली हे दोघे पती पत्नी एम एच 05 ए एल 260 क्रमांकांच्या दुचाकीने दवाखाना व बाजार करण्यासाठी दोंडाईचा कडे जात असताना एम एच 20 बी एल 4045 क्रमांकाची धुळे बडोदा बस व दुचाकीची धडक झाल्याने सदर अपघातात दोघेही गिरासे पती पत्नी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्जुन नरोटे यांनी मृत घोषित केले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन गायकवाड, दिनेश मोरे यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक व गावातील मंडळींनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली व नातेवाइकांनी एकच टाहो फोडला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या