धुळे –
खा.सुप्रिया सुळे या आज 28 रोजी धुळे दौर्यावर येत आहेत. यादरम्यान त्या शहरातील विकास कामांची पाहणी करतील.
जळगाव येथील नियोजित कार्यक्रम आटोपून सायंकाळी 4 वा. खा.सुळे धुळ्यात पोहचतील.
- Advertisement -
सायंकाळी 4.15 वाजता छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजेरी लावतील. 5.30 वा. नियोजित सफारी गार्डची पाहणी, 6 वाजता शिवतिर्थ येथे आगमन अग्रसेन स्मारक, गुरु-शिष्य स्मारक, परमविरचक्र अब्दुल हमीद स्मारकास अभिवादन करतील 6.30 वाजता गुरु-शिष्य स्मारकास भेट, त्यानंतर त्या पांझरा लगतच्या भगवान शंकर स्मारकाची आणि झुलत्या पुलाच्या कामाची पाहणी करतील.
तसेच सायंकाळी 7.15 ला जिल्हा ग्रंथालयात आगमन, 8 वाजता याचठिकाणी पत्रपरिषद, त्यानंतर त्या चाळीसगावकडे रवाना होतील. असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी कळविले आहे.