धुळे – प्रतिनिधी dhule
शहरात 4 ते 19 एप्रिल या कालावधीत आदिशक्ती श्री एकविरा देवीची यात्रा भरणार आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दर्शनासाठी होते. यात्रा उत्सव काळात वाहतुकीचे नियमन, नियोजन करता यावे व भाविकांची गैरसोय होवु नये म्हणुन वाहतुक नियंत्रणासाठी शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी ठराविक वेळेत तात्पुरता स्वरुपात बंद करण्यात येत असल्याची अधिसुचना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी निर्गमित केली आहे.
ऐकावे ते नवलचं ; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पतीच्या उमेदवारी अर्जाची चोरी
त्यानुसार 4 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजेपासुन ते रात्री 10 वाजेपावेतो तसेच 5 ते 19 एप्रिल पावेतो दररोज सायंकाळी 5 ते 10 वाजेपावेतो नेहरु चौक (जुना आग्रा रोड) मुख्य प्रवेशद्वार ते श्री एकविरा देवी मंदिर पावेतोचा रस्ता, जुने धुळे ते नविन पुल ते श्री एकविरा देवी मंदिर पावेतोचा रस्ता, पंचवटी महादेव मंदिर ते जवाहरलाल नेहरु स्टेडीयम टी.पॉईंटचा रस्ता, प्रभात नगर ते जुने धुळेकडील नविन पुल पावेतोचा रस्ता, प्रभात नगर ते अमरधामकड्डुन ते श्री एकविरा देवी मंदिर पावेतोचा रस्ता, वीर सावरकर पुतळा ते जुने धुळे नविन पुल पावेतोचा रस्ता वाहतुकीस बंद राहील. या कालावधीत अवजड वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. हे निर्बंध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका व अग्निशामक दलाची वाहने यांना लागु होणार नाही. त्याचप्रमाणे वरील मार्गात व वेळेत परीस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत, असे पोलीस अधीक्षक श्री.बारकुंड यांनी कळविले आहे.