Saturday, May 17, 2025
Homeधुळेमहिलेचे बसमधून दोन लाखांचे दागिने लंपास

महिलेचे बसमधून दोन लाखांचे दागिने लंपास

धुळे  – 

- Advertisement -

शिंदखेडा-जळगाव बसमध्ये प्रवास करतांना नरडाणा-बेटावद  गावादरम्यान तावसे (ता. चोपडा) येथील  महिलेच्या कापडी पिशवीतून चोरट्यांनी 1 लाख 96 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणातील अज्ञात चोरट्यांविरूध्द नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तावसे (ता. चोपडा जि. जळगाव) येथील अनिल बळीराम पाटील हे दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास पत्नीसह शिंदखेडा – जळगाव बसने प्रवास करीत होते.

नरडाणा ते बेटावद दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील कापडी बॅगच्या साईडच्या कप्प्याची चैन उघडून कापडी बॅगेतून 70 हजार रुपयांचा 3 तोळे 5 ग्रॅमचा राणीहार, 70 हजार रुपये किंमतीची 3 तोळे 5 ग्रॅमची सोन्याची मंगलपोत, 24 हजार रुपयांचे 12 गॅ्रम वजनाचे सोन्याचे वेल, 10 हजार रुपये किंमतीची  10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 20 हजार रुपयांचे दोन 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, 2 हजार रुपयांचे चांदीचे 12 भार वजनाचे तोडे असा एकुण 1 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

याप्रकरणी  अनिल बळीराम पाटील  (रा. तावसे ता. चोपडा ह. मु. हरीओम पुजा हौसिंग सोसायटी, गरीबवाडा, डोंबीवली वेस्ट, जि. ठाणे) यांनी नरडाणा पोलीस फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरटयांवर भादंवी 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १७ मे २०२५- उत्तरे शोधावीच लागतील

0
वातावरण अजूनही ढगाळ असले तरी अवकाळी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. तथापि गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या कोसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिक...