धुळे – प्रतिनिधी Dhule
शहरातील पांझरा नदीकिनारी कालिका माता मंदिराजवळ एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
- Advertisement -
घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, संतोष तिगोटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील आदींसह पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे दिसून येत असून पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.