Wednesday, April 2, 2025
Homeधुळेधुळे जिल्ह्यात साडेनऊ वाजेपर्यंत 8.11 टक्के मतदान

धुळे जिल्ह्यात साडेनऊ वाजेपर्यंत 8.11 टक्के मतदान

धुळे-  प्रतिनिधी

धुळे जिल्हा परिषदेच्या  गट व गणांसाठी आज  सकाळी साडेसात वाजेपासून मतदान सुरू झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात 8.11  टक्के मतदान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ५६ गट व ११२ गणांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिरपूर तालुक्यातील वाघाडी, कोडीद, पळासनेर, रोहिणी व धुळे तालुक्यातील लामकानी हे गट बिनविरोध झाले. तर वाघाडी,वाडी (ता.शिरपूर) व धाडणे (ता.साक्री) हे तीन गण यापूर्वीच बिनविरोध झालेले आहेत. त्यामुळे आता ५१ गट व १०९ गणासाठी मतदान होत आहे.गटासाठी १६४ व गणात ३२९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थंडीतही सकाळी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.  तर नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत सकाळी साडे नऊ पर्यंत 9.28 टक्के मतदान झाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ०२ एप्रिल २०२५ – कचरा व्यवस्थापन अत्यावश्यकच

0
घनकचरा व्यवस्थापन हा चिंतेचा आणि वादविवादाचा विषय बनला आहे. त्यावर ‘कॅग’च्या अहवालानेही शिक्कामोर्तब केले आहे. घनकचरा व्यवस्थापनात स्थानिक स्वराज्य संस्था अपयशी ठरल्याचा ठपका कॅगने...