धुळे । प्रतिनिधी Dhule
शहरातील चाळीसगाव रोडवरील कामगार नगरातून पोलिसांनी आज पहाटे दुचाकीसह एकाला पकडले. त्यांच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसह विविध हत्यारे जप्त केली. तर त्याच्या घरझडतीतूनही 17 मोबाईल, 9 घड्याळ असा एकुण 1 लाख 18 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील चाळीसगाव पोलिसांचे पथका मध्यरात्री 1 वाजेचे सुमारास पेट्रोलींग दरम्यान लोकमान्य हॉस्पीटलकडे जात असतांना शहरातील कामगार नगर बस थांबा जवळ पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास एक व्यक्ती मोटरसायकलसह हातात एक चॉपर व एक लाकडी दांडा घेवून उभा होता. त्या व्यक्तीवर संशय आल्याने वाहन थांबवून त्याची चौकशी केली असता अशाबरअली केसरअली शहा रा. पुर्व हुडको, जामचा मळा असल्याचे त्यांनी सांगितले.
मोटार सायकल (क्र.एम.एच 02 ए.ई 3866) ही त्याचीच असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या हातातील चॉपर व काठी बाबत त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मोटार सायकलची झडती घेतली असता 80 हजार 760 रुपयाचा मुद्देमाल आढळून आला. त्यात 4060 रुपये रोख रुपये, दोन जीवंत काडतुस एक गावठी पिस्टल, एक चॉपर, एक चाकु, एक फायटर, व एक लाकडी दांडका व दोन मोबाईल, मोटर सायकल यांचा समावेश आहे.
याप्रकरणी अशाबरअली शहा याच्याविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात संशयीताया घरातून 15 मोबाईल व 9 हातातील घडयाळे एक पाण्याची मोटर व एक टेबल फॅन असा 37 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. असा एकुण 1 लख 18 हजार 260 रुपये किंमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई सपोनि विलास ठाकरे, पोसई ठिकले, पोहेकॉ अजीज शेख, पोकॉ प्रेमराज पाटील, पोकॉ सुशिल शेंडे, पोकॉ स्वप्नील सोनवणे, पोकॉ सोमनाथ चीरे, असई राजेंद्र पवार, पोकॉ बाळासाहेब डोईफोडे, पोना प्रदिप पाटील यांच्या पथकाने केली.