Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedकर्तुत्ववान शेतकरी महिलांशी देशदूत विशेष कट्ट्यावर संवाद : धैर्य,जिद्दीच्या बळावर भरारी

कर्तुत्ववान शेतकरी महिलांशी देशदूत विशेष कट्ट्यावर संवाद : धैर्य,जिद्दीच्या बळावर भरारी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महिलेला देवानेच कणखर बनवले आहे. एखादी जबाबदारी पूर्ण करायची हे जर तिने ठरवले तर कितीही संकटे आली तरी ती जबाबदारी मोठ्या जिद्दीने पार पाडून आपले कर्तृत्व सिद्ध करतेच.हे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कुटुंंबातील कर्तृत्ववान महिलांं प्रतिमा मोरे,शैला मोरे, मिना जगताप, कल्पना संंकलेचा, कल्पना शिंदे, सुगंधा भोये, ज्योती कोटमे, मनीषा इंंगळे यांनी सिध्द करुन दाखवले आहे. प्रत्येकीचा गुण घेण्यासारखा आहे. प्रत्येकीकडे एक गोष्ट सारखीच आहे ती म्हणजे जिद्द.त्या बळावरच त्या भरारी घेत आहेत.जागतिक महिला दिनानिमित्त दैेनिक ‘देशदूत’च्या संंपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांनी या कर्तृत्ववान महिलांशी साधलेला संवाद.

- Advertisement -

शेवग्याच्या शेतीत लक्ष्य केंद्रीत करुन उत्पादनापासून ते पँकींंग,मार्केटींंगपर्यंंत सर्वत्र आघाडी घेतली. बाराही महिने चांंगले उत्पन्न देणारे पिक म्हणून शेवग्याकडे पाहिले.त्यात बर्‍यापैकी यश मिळाले.

– ज्योती कोटमे,कोटमगाव

सेंंद्रीय शेतीचा वारसा, छंद जोपासला. उत्कृष्ट द्राक्ष उत्पादन करुन परदेशात पाठवली.आता मुले, सुनांच्या हाती कारभार सोपवला आहे.करोना काळात टेरेसवर शेेतीचा प्रयोग केला. टोमॅटो, पपई,आंब्यासह विविध पिके घेत आजही तो छंंद जोपासत आहे.बेदाणे निर्मितीतही वेगळा ठसा उमटवला आहे.

– शैला मोरे,पिंपळगाव बसवंत

द्राक्षांचे नवनवीन सर्व प्रयोग केले.द्राक्ष निर्यातीचा श्री गणेशा जिल्ह्यात करण्याचे भाग्य मला लाभले. लंडनला प्रथम द्राक्ष पाठवण्याचे काम केले.आता गेल्या तीन वर्षापासून बेदाण्याचा नवा बॅ्रण्ड विकसीत केला आहे.त्यालाही मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

– मिना जगताप,पिंपळगाव बसवंत

मी स्रीरोग तज्ञ असूनही वडीलोपार्जीत शेतीत लक्ष घालून सेंद्रीय शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. कांदा आणि गहु दरवर्षी चांगल्या प्रकारे पिकवते.आठवड्यातील तीन दिवस शेतात असते. मजुरांकडून काम करुन घेते. शेतकरी आणि डॉक्टर आणि गृहीणी अशा तिेहेरी भूमिका सांंभाळताना सामाजीक बांधीलकीला प्राधान्य देते.

– डॉ. कल्पना संंकलेचा,नाशिक

कुंभारबारी सारख्या गावात मोगर्‍याची शेती फुलवून इतरांच्या जीवनातही सुगंध पसरवण्याचे काम करत असल्याने मनाला एक वेगळेच समाधान मिळते.साडेपाचशे मोगर्‍याची झाडे लावून रोज किमान एक हजार रुपये पदरी पडतात.स्वता बरोबरच इतरांनाही रोजगार देण्याचे काम माझ्या शेतीच्या माध्यमातून होत असल्याने एक वेगळाच आनंद मिळतो.

सुगंधा भोये ,पेठ

गेल्या दहा वर्षापासून मालेगाव तालुक्यात साकुरे गावात विषमक्ुत शेतीचा प्रयोग करत आहे. अनंत अडचणी आल्या.मात्र आता विषमुक्त शेतीचे महत्व सर्वांना पटले आहे. विषमुक्त शेती करुन इतरानाही चांगले खायला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. औषधी युनीट उभारुन इतरांनाही विष मुक्त शेती करण्यास प्रोत्साहन देत आहे.

– मनीषा इंगळे ,मालेगाव

द्राक्षाबरोबरच आता हळदीची शेती विकसीत केली आहे. तिच्या उत्पादनापासून ते मार्केटींगपर्यंत तंंत्र अवगत केले आहे. सुरवात चांगली झाली आहे.भविष्यात या व्यवसायात चांगले भवितव्य आहे असा विश्वास वाटतो.

– प्रतीमा मोरे,पिंपळगाव बसवंत

पहाटे पाच वाजेपासून रात्री दहापर्यंत घरकाम अन् शेतात राबून सर्व प्रकारचा सेंंद्रीय भाजीपाला पिकवण्याचे तंत्र अवगत केले आहे.मजुरांकडून काम करुन घेण्याचे तंत्र अवगत करुन कांद्यापासून ते मेथीपयर्ंंत सर्व प्रकारचा भाजीपाला पिकवून त्याला कायमस्वरुपी बाजारपेठ मिळवण्यात यश मिळाले आहे.

– कल्पना शिंदे,पिंपळगाव बसवंत

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अनुभवाचे बोल

महिला दिनाच्या निमित्ताने या कर्तृत्ववान महिलांनी समस्त महिलावर्गाला स्व:तासाठी काही दिवस स्वच्छंद पणे जगण्याचा तसेच आरोग्य जपण्याचा सल्लाही दिला आहे.

स्रीचा पिंड कामाचा, सहनशिलतेचा असतो. ती वर्षभर कामच करत राहते. आता वर्षातून ठराविक दिवसतरी तिने स्वताःसाठी दिले पाहिजेत. मनासारखे जगण्याची इच्छाही तिने पूर्ण केली पाहिजे.

नवीन पिढीने आता शेतीत पुढे आले पाहिजे.नवनवीन तंंत्रज्ञान वापरुन शेती विकसित केली पाहिजे.शेती वाईट नाही. ती कशी करायची हे समजून घेतले पाहिजे.

महिलेने स्वताःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.तिचे आरोग्य चांगले तरच कुटंबांचे आरोग्य व आनंंद टिकून राहतो.

महिलांना समजून घेतले पाहिजे. त्यांनी मागे राहू नये. मुलींनी न घाबरता न थांबता इतरांची चांगली प्रेरणा घेऊन काम करत राहिले पाहीजे.आपली प्रेरणा इतरांना घ्यावीशी वाटली पाहिजे. एवढे चांगले काम हातून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

महिलांनी बाहेर पडुन नवनवीन माहिती जाणून घेतली पाहिजे. शेतकरी नवराही चांंगला असतो. तंत्रज्ञान वापरुन शेती केल्यास ती फायदेशीरच ठरते,असे त्यांंनी आवर्जुन सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या