Monday, July 22, 2024
Homeनगरडिझेल चोरणार्‍या सहा जणांना पोलीस कोठडी

डिझेल चोरणार्‍या सहा जणांना पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

महामार्गावर रात्रीचे वेळी थांबलेल्या मालवाहतूक ट्रकच्या टाकीतील डिझेल चोरणार्‍या टोळीला न्यायालयासमोर हजर केले असता 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने डिझेल चोरणार्‍या टोळीतील आरोपी राजाराम गंगाराम फुलेरीया (वय 38), धर्मेंद्र शिवनारायण ऊर्फ शिवलाल सोलंकी (वय 27), राहुल जुगलकिशोर चंदेल (वय 21 सर्व, रा. रामदुपाडा, जिल्हा साजापूर, मध्यप्रदेश), अशोक रामचंदर मालवीय (वय 29), गोविंद पिरूलाल मालवीय (वय 30 दोन्ही रा. सांगवीमाना, ता. जि. साजापूर, मध्यप्रदेश), अनिकेत राजेश बोरनार (वय 24, रा. उस्थळदुमाला, ता. नेवासा) यांना अटक केली होती.

या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पाच दिवसांची कोठडी देण्यात आली. अ‍ॅड. अनिकेत आव्हाड यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या