Thursday, May 23, 2024
Homeनगरडिजिटल सभासद नोंदणीसाठी 15 हजार बूथ नोंदणी अधिकारी नेमणार - बाळासाहेब साळुंके

डिजिटल सभासद नोंदणीसाठी 15 हजार बूथ नोंदणी अधिकारी नेमणार – बाळासाहेब साळुंके

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील 3 हजार 850 बूथवर प्रत्येक बूथसाठी 4 नोंदणी अधिकारी याप्रमाणे जिल्ह्यात 15 हजार बूथ नोंदणी अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक बुथवर नोंदणी प्रतिनिधींच्या माध्यमातून डिजिटल सभासद नोंदणी अभियान जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. या अभियानात पक्षाचे सर्व पदाधिकार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी केले.

- Advertisement -

डिजिटल सभासद नोंदणीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या जिल्हा परिषद गटातील व नगर पालिका प्रभागातील मुख्य नोंदणी अधिकार्‍यांच्या दक्षिण नगर जिल्ह्याच्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले, काँग्रेस पक्षाने प्रथमच डिजिटल सभासद नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावातील बूथवर सभासद नोंदणी करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या सभासद नोंदणी कार्यक्रमांतर्गत काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे प्रत्येक गाव व वाडी वस्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी सभासद नोंदणी मोहिमेअंतर्गत जिल्हाभर एक अभियान स्वरूपात नोंदणी करण्याचे पक्षाने ठरविले असून या नोंदणीमध्ये समाजातील घटकांना काँग्रेस पक्षाचे सभासद करून घेण्यात येईल.

डिजिटल सभासद नोंदणी करताना प्रत्येक मतदाराचे मतदान ओळखपत्राचा मुख्य आधार घेऊनच ही सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. या सभासद नोंदणी बाबतचे प्रेझेंटेशन जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी सादर केले. या प्रशिक्षण शिबिर दरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दीप चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत लुणिया, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, कार्याध्यक्ष राहुल उगले यांच्यासह तालुकाध्यक्ष नासीर शेख, डॉ. अमोल फडके, संपतराव म्हस्के, किरण पाटील, शहाजी राजे भोसले, श्यामराव वाघस्कर, प्रल्हाद मोटे, मार्गारेट जाधव, मंगल भुजबळ, योगेश शिंदे, सीताराम देठे, समीर काझी, योगेश भोईटे, आदेश नागवडे, किशोर डांगे, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाणे आदिंसह मुख्य नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या