Thursday, May 23, 2024
Homeनगरडिकसळ येथे बापाने केला मुलाचा खून

डिकसळ येथे बापाने केला मुलाचा खून

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे मुलगा व बापाच्या किरकोळ वादावरून नशा केलेल्या बापाने मुलाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून केल्याची घटना बुधवारी (दि.12) दुपारी घडली. रोहिदास बापूराव लाढाणे (65, रा. डिकसळ, ता. कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. तर या घटनेत मुलगा अमोल रोहिदास लाढाणे (28) हा जागीच ठार झाला आहे. अमोल लढाणे हा घराच्या अंगणात बसला असता त्याचे वडिल रोहिदास लढाणे यांच्याशी दुपारी तीनच्या सुमारास किरकोळ शाब्दिक चकमक झाली.

- Advertisement -

यातूनच चिडलेल्या बापाने मुलाच्या डोक्यात ब्लॉक घातला. यात मुलगा जागीच ठार झाला असून आरोपी रोहिदास बापूराव लाढाणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत अमोल याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. या घटनेचा तपास मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ . सुनील माळशिखारे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या