Friday, November 22, 2024
Homeनगरशिवसेनेचे शहर प्रमुख सातपुते यांची 25 लाखाची फसवणूक

शिवसेनेचे शहर प्रमुख सातपुते यांची 25 लाखाची फसवणूक

जमिनीचा व्यवहार || सहा जणांविरूध्द कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिवसेना शिंदे गटाचे नगर शहर प्रमुख दिलीप नानाभाऊ सातपुते (वय 49 रा. भुषणनगर, केडगाव) यांची जमीन व्यवहारातून (Land Transactions) 25 लाखाची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी सोमवारी (10 जून) दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुशराव जयवंतराव नागरे, जालिंदर जयवंतराव नागरे, गजेंद्र बाळासाहेब नागरे, शांताबाई बाळासाहेब नागरे, कविता संजय फुंदे व राजकुमार अंकुशराव नागरे (सर्व रा. संगम जळगाव ता. गेवराई, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

नागरे कुटुंबाची नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात शेत जमीन मिळकत गट नंबर 696 मध्ये 19 एकर जमीन (Land) आहे. ती जमीन सातपुते यांनी सन 2014 मध्ये नोटरी साठेखत करून घेतली होती. त्याबद्दल्यात त्यांनी नागरे कुटुंबाला 25 लाख रूपये दिले होते. दरम्यान सदरचे साठेखत रद्द न करता नागरे कुटुंबाने सातपुते यांचा विश्वासघात करून ती जमीन दुसर्‍याला विकली.

3 एप्रिल 2024 रोजी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खत दस्त नंबर 3546/2024 अन्वये राकेशकुमार सिंग (रा. अर्जुन पार्क, श्रध्दा विहार, इंदिरानगर, नाशिक), अंकुश बाळु ठोकळ (रा. कामरगाव) यांना सदरची जमीन विक्री करून विश्वासघात करून 25 लाख रूपयांची फसवणूक (Fraud) केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याबाबत सातपुते यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज चौकशीसाठी कोतवाली पोलिसांकडे आला. पोलिसांनी अर्ज चौकशी करून 10 जून रोजी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या