Sunday, May 26, 2024
Homeनगरडिंभे धरण निम्मे; एवढा आहे कुकडीतील पाणीसाठा

डिंभे धरण निम्मे; एवढा आहे कुकडीतील पाणीसाठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाणी साठ्याच्यादृष्टीने कुकडी प्रकल्पातील डिंभे सर्वात मोठे धरण. या धरणाची साठवण क्षमता 13.50 टीएमसी आहे. या धरणातील पाणीसाठाही 50 टक्क्यांवर गेलेला आहे. या धरणातील एकूण पाणीसाठा 7171 दलघफू झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा 6230 दलघफू आहे.

- Advertisement -

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत कुकडी समूह धरणांमध्ये 1277 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने उपयुक्त पाणीसाठा 11710 दलघफू झाला आहे.

साडेतीन टीएमसी क्षमतेच्या येडगाव धरणातील पाणीसाठा 1892 दलघफू (71.62 टक्के) झाला होता. मांडवी नदीवरील चिल्हेवाडी धरणातील पाणीसाठा 725 दलघफू ‘जैसे थे’ आहे. वडजचा पाणीसाठा 50 टक्के तर माणिकडोहचा पाणीठा 34 टक्के झालेला आहे. पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा अजूनही मायनसमध्ये आहे.

या धरणातील पाण्यावर नगरजवळील शिरूर, तसेच जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यांतील शेती व पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे.

गत वर्षीच्या तुलनेत यंदा या धरणांमधील पाणीसाठा कमीच आहे. गतवर्षी या धरणांमधील एकूण पाणीसाठा 20759 दलघफू (70टक्के) होता.यंदा केवळ 40 टक्के पाणीसाठा आहे. घोड धरणातही नवीन पाण्याची आवक झालेली नाही. त्याळळे या धरणातील पाणीसाठा अजूनही मायनसमध्ये आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या