Monday, May 27, 2024
Homeनगरडिंभे, वडज 100 टक्के भरले

डिंभे, वडज 100 टक्के भरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर (Ahmednagar), पुणे (Pune) व सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 49 हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देणारे डिंभे धरण (Dimbhe Dam) 100 टक्के भरले असून काल सोमवारी दुपारी 3 वाजता 3000 क्युसेकने पाणी घोडनदी (Ghod River) पात्रात सोडण्यात आले. तत्पूर्वी वडज धरणही (Vadaj Dam) रात्रीच ओव्हरफ्लो झाले आहे. डिंभे धरणातून (Dimbhe Dam) सायकाळी 7 वाजता 6720 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. त्यामुळे घोड धरणातील पाणीसाठ्यात (Ghod Dam Water Storage) जलदगतीने वाढ होणार आहे.

- Advertisement -

गत चार दिवसांपासून पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या आंबेगाव (Ambegav) तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील आहुपे, पाटण व भीमाशंकर (Bhimashankar) खोर्‍यात चार दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने काल 13 सप्टेंबर रोजी डिंभे धरण 100 टक्के भरले. त्यापूर्वी वडज सोमवारी रात्री तर डिंभे धरण (Dimbhe Dam) दुपारी ओव्हरफ्लो झाले. वडजमधून1500 क्युसेक तर डिंभेतून (Dimbhe) 4800 क्युसेकने पाणी सोडणे सुरू आहे.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 443 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने या सर्व धरणांतील एकूण पाणीसाठा 22150 दलघफू (75टक्के) झाला आहे.

कुकडी प्रकल्पात सर्वात मोठे धरण. 13495 दलघफू क्षमतेचे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दुपारी 2880 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर पाऊस सुरू असल्याने दुपारी 4 वाजता तो वाढविण्यात येऊन तो 4800 करण्यात आला. उजवा व डावा कालवाही सुरू आहे.

मागील वर्षी कुकडी प्रकल्पात काल सायंकाळ अखेर 22150 दलघफू (75 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. गतवर्षीच्या तलनेत यंदा जादा पाणी आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने कुकडी प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठयात लक्षणीय वाढ झाली आहे.

कुकडी प्रकल्पा (Kukadi Project) अंतर्गत असलेल्या येडगाव (Yedgav), माणिकडोह (Manikdoh), वडज (Vadaj), पिंपळगाव जोगे (Pimpalgav Joge), डिंभे (Dimbhe) या प्रमुख पाच धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता 30 टीएमसी आहे. या प्रकल्पाव्दारे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा (Shrigonda) या सात तालुक्यातील शेती सिंचनासाठी होतो. रब्बी हंगामातील सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे.जून अखेर प्रकल्पात 2.64 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मागील एक महिना पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांमधून चिंता व्यक्त होत होती.

मात्र मागील चार दिवसांत प्रामुख्याने डिंभे (Dimbhe), माणिकडोह धरण (Manikdoh Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून लाभधारक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.प्रकल्पा अंतर्गत डिंभे, वडज धरणात शंभर टक्के तर पिंपळगाव जोगे धरणाचा अपवाद वगळता इतर धरणात पन्नास टक्क्यां पेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे. कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणात काल सायंकाळी चार वाजेपर्यंत झालेला उपयुक्त पाणीसाठा टीएमसी (कंसात टक्के): येडगाव:1443 (58.84 ),माणिकडोह: 5.490 (53.95 ),वडज: 1.174 (100 ), डिंभे 12.495 (100 ),पिंपळगाव जोगे : 1.772 (45.57)

- Advertisment -

ताज्या बातम्या