Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिंडोरी : वैध मापण शास्त्र विभागातील निरीक्षक लाच स्वीकारताना 'एसीबी'च्या जाळ्यात

दिंडोरी : वैध मापण शास्त्र विभागातील निरीक्षक लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिंडोरी / ओझे | प्रतिनिधी Dindori / Oze

- Advertisement -

दिंडोरी -वणी रस्त्यावरील पेट्रोल पंपाचे नोझल मापकाचे प्रमाणपत्र देण्यासाठी 24 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वैध मापण शास्त्र विभागातील निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

अवनखेड शिवारातील ओम साई पेट्रोल पंपाच्या मालकाने वार्षिक परीक्षण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरून पडताळणीसाठी अर्ज केला होता त्याप्रमाणे पडताळणीसाठी आलेले वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक भगवान डोल्हारे यांनी पेट्रोल पंपाची पाहणी केली व प्रमाणपत्राचे देण्याचे मोबदल्यात शासकीय शुल्कव्यतिरिक्त चार नोझलचे सहा हजार रुपये प्रमाणे 24 हजार रुपये मागितले. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भगवान डोल्हारे यांना रंगेहात पकडले .

ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी पोलीस हवालदार विनोद चौधरी अनिल गांगोडे यांनी केली. भगवान डोल्हारे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...