Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकDindori Leopard News : कोचरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच ग्रामस्थ जखमी

Dindori Leopard News : कोचरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच ग्रामस्थ जखमी

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कोचरगाव (Kochargaon) येथे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नाशिक (Nashik) येथील रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, वामन नाना लिलके हे पांडूरंग देसले यांच्या पडीत क्षेत्रात शौचविधीसाठी गेले असतांना सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास झाडाझुडपात लपलेल्या बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. यावेळी त्यांचा आवाज ऐकून शेजारी शेतात काम करणारे व रस्त्याने जाणारे सोमनाथ केरु लिलके,विठ्ठल केरु लिलके, लहानू कचरु लिलके, लहानू पांडूरंग लिलके त्यांना वाचविण्यासाठी गेले असता त्यांच्या देखील हातावर, मांडीवर बिबट्याने चावा घेतला.त्यांच्या पाठीवर पोटावर बिबट्याने पंजाच्या जखमा केल्या आहेत. तर पडीत शेत हे १० ते १२ एकर असल्याने हल्ला करणारा बिबटे त्याच ठिकाणी लपल्याचे स्थानिकांनी माहिती दिल्याने तेथे पिंजरा (Cage) लावण्यात आला आहे.

YouTube video player

दरम्यान, जखमींना (Injured) स्थानिकांनी तात्काळ कोचरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार दिले व पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या जखमींवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच घटनास्थळाची सहाय्यक वनसंरक्षक संतोष सोनवणे, वनपरीक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे, वनरक्षक बागुल, वनरक्षक गांगोडे, वनसेवक पेलमहाले, शिरसाठ, जाधव, भुसारे, स्थानिक पोलिस पाटील लिलके, ग्रा.पं. सदस्य टोंगारे यांनी पाहणी करुन आजूबाजूचे शेतकरी, मजूर तसेच ग्रामस्थांना खबरदारीबाबत सूचना केल्या आहेत.

ताज्या बातम्या