Sunday, June 16, 2024
Homeनाशिकतुफान राडा! शिक्षकांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

तुफान राडा! शिक्षकांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

दिंडोरी । प्रतिनिधी

- Advertisement -

दिंडोरीमध्ये मागील दोन महिन्यांपूर्वी दोन शिक्षकांमध्ये पूर्व- वैमनस्यातून झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर प्रशासनाकडून कारवाईस विलंब होत असतानाच अचानक दोन शिक्षकांच्या ‘त्या’ हाणामारीचा व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये सर्वत्र फिरत असल्याने प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत. आता तरी प्रशासन दखल घेईल का असा सवाल केला जात आहे

दिंडोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ३ मध्ये नवनियुक्त केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत केंद्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मागील काळात केंद्रप्रमुखांचा अतिरीक्त कारभार सांभाळणाऱ्या एका शिक्षकानी आपण कार्यभार कसा सांभळला व आलेला अनुभव याविषयी उपस्थितांना माहिती देत असतांना नवनियुक्त केंद्रप्रमुख व उपस्थितीत मुख्याध्यापकांसमोर पूर्ववैमनस्यातून दोन शिक्षकांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.

हे ही वाचा : नाशिकच्या महिलेस सोलापूरच्या सराफांकडून ७६ लाखांचा गंडा

या शाब्दीक चकमकीचे तुंबळ हाणामारीत रुपांतर झाले. मारामारी इतकी जोरदार झाली की त्यातील एका शिक्षकाचा हात खांद्यापासून निखळल्याची चर्चा आहे. त्यानंतर संबंधित शिक्षक पोलीस ठाण्यामध्ये मारहाण झाल्याची फिर्याद देण्यासाठी दाखल झाले. पोलिसांनी आधी स्वतः उपचार करुन घ्या, नंतर संबंधितावर गुन्हा दाखल करु असे सांगून दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने संबंधित शिक्षकास दिंडोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले.

हे ही वाचा : सायबर फसवणुकीला उधाण

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात सदर शिक्षक गेल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. ही बाब गटविकास अधिकाऱ्यापर्यत पोहचताच त्यांनी संबंधित विभागाला सत्यता पडताळणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवाल व सत्य परिस्थिती जाणून घेवून गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी संयुक्तपणे संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवला. परंतु दोन महिने उलटून देखील जिल्हा परिषद प्रशासन या शिक्षकांवर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र हाणामारीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या