उत्तर प्रदेशातील अयोध्येत 25 लाखांहून अधिक मातीच्या दिव्यांनी शहर उजळून टाकले असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे.प्रभू श्रीरामाचे मंदीर लाखो दिव्यांच्या उजेडानी सजले आहे.
श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. शरयू नदीच्या 55 घाटांवर एकाच वेळी 25 लाख दिव्यांच्या रोषणाईने एक मोठा विक्रम झाला आहे.
- Advertisement -
दीपोत्सव सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत 1,100 लोकांनी शरयू नदीच्या काठावर विशेष आरती केली या कार्यक्रमात अनेक देशांतील कलाकारांच्या सादरीकरणाचाही समावेश होता.
स्वयंसेवकांनी अयोध्येतील 55 घाटांवर, विशेषत: नवीन घाट, जुना घाट यांसारख्या भागात दिवे लाऊन जागतिक विक्रम करण्यासाठी प्रयत्न केले.