दोंडाईचा । dondaechi । श.प्र.
दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dondai’s Agricultural Produce Market Committee) पंचवार्षिक निवडणुकीत (Elections) आज माघारीच्या शेवटच्या दिवशी 202 पैकी 166 उमेदवारांनी माघार घेतली असुन 16 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी दिली.
व्यापारी मतदारसंघातून भाजपाच्या दोन जागा (जयकिसान पॅनल) बिनविरोध निवडून आल्या आहेत. म्हणून आता 18 पैकी 16 जागांसाठी मतदान होणार असून भाजपच्या जयकिसान पॅनल तर महाविकास आघाडीत सरळ लढत होणार आहे.
निवडणुकीत सेवा सहकारी संस्था एकूण 11 जागांपैकी सर्वसाधारण मतदारसंघात सात जागांसाठी 98 नामनिर्देशन अर्ज दाखल झालेे होते. त्यापैकी 82 उमेदवारांची माघार घेतली. महिला राखीव मतदारसंघात दोन जागांसाठी 19 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 13 उमेदवारांनी माघार घेतली, इतरमागास प्रवर्ग एक जागेसाठी 17 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी माघार घेतली. विमुक्त जाती/भटक्या जमाती 1 जागेसाठी 10 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 उमेदवारांनी माघार घेतली. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या 4 जागा असुन त्यात सर्वसाधारण 2 जागांसाठी 34 नामनिर्देशन झाले होते. त्यापैकी 28 उमेदवारांनी माघार घेतली. यात अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी 13 नामनिर्देशन अर्ज दाखल त्यापैकी 9 उमेदवारांनी माघार घेतली.हमाल मापाडी एका जागेसाठी 10 अर्जापैकी 7 उमेदवारांनी माघारी घेतली.
दि. 28 एप्रिलला मतदान होणार असून सरळ लढत भारतीय जनता पार्टी ( जयकिसान पॅनल) व महाविकास आघाडी पुरस्कृत (शेतकरी परिवर्तन )यांच्यात होईल. तर 2 उमेदवार अपक्ष असून सेवा सोसायटी सर्वसाधारण 1, हमाल मापडी साठी 1 असे निवडणूक लढवीत आहेत. आज सकाळी 11 वाजता चिन्ह वाटप होणार आहे.