मुंबई | Mumbai
अभिनेत्री पायल घोषने(Payal Ghosh) प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) छेडछाडीचा आरोप केला होता. पायल घोषने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की अनुराग कश्यपने तिला घरी बोलावले होते आणि तिच्यावर जबरदस्ती केली होती.
अभिनेत्री पायल घोषने केलेल्या आरोपांनंतर विविध स्तरांवरुन दिग्दर्शक अनुराग कश्यप याला पाठिंबा दिला जात आहे. अभिनेत्री तापसी पन्नूनंतर आता अभिनेत्री राधिका आपटे हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत अनुराग कश्यपला पाठिंबा दर्शवला आहे. राधिकाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत पाठिंबा दर्शवला आहे.
अभिनेत्री राधिका आपटेने म्हंटले आहे की, “अनुराग तू माझा खूप चांगला मित्र आहेस तू मला नेहमीच प्रेरित करतोस आणि तू नेहमी माझ्यासोबत उभा राहीला आहेस. आपले एकमेकांविषयीचे प्रेम आणि आदर खूप वेगळा आहे. तू नेहमीच माझा चांगला मित्र होतास आणि राहशील”
अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) देखील अनुराग कश्यपला पाठिंबा दर्शवला होता. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिने आपला अनुरागसोबतचा फोटो शेअर करत म्हंटले आहे की, “तू सर्वात मोठा Feminist आहेस. लवकरच सेटवर भेटू, ज्या आर्टच्या जगात जिथे तू महिलांना शक्तिशाली आणि बलवान दाखवतोस.”
अनुराग कश्यपने पायल घोषच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. त्याने लिहिले होते- “क्या बात है, इतका वेळ घेतला माझे तोंड बंद करण्याच्या प्रयत्नात. चल काही नाही. मला गप्प बसवण्याच्या प्रयत्नात इतके खोटे बोललात की एक स्त्री असूनही इतर स्त्रीयांनाही यात ओढले. थोडीतरी मर्यादा ठेवायची होती मॅडम. बस, इतकेच म्हणेन की जे सर्व आरोप लावले आहेत ते सर्व बिनबुडाचे आहेत.”