हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. निशिकांत कामत गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. हैदराबादमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रितेश देशमुख यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
काही तासांआधी रितेश देशमुख यांनी ट्विट मध्ये म्हंटले होते की, “निशिकांत कामात हे व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”
- Advertisement -
त्यानंतर काही वेळातच त्यांनी ट्विट करत निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी दिली आहे. रितेशने ट्विट करत म्हंटले आहे की, “तू नेहमी आठवणीत राहशील. निशिकांत कामत तुझ्या आत्म्यास शांती लाभो.!”
निशिकांत कामत यांनी लई भारी सह डोंबिवली फास्ट, सातच्या आत घरात, फोर्स, मुंबई मेरी जान, मदारी, रॉकी हॅण्डसम आणि दृश्यम चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे.