Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAshutosh Gowariker : अभिमानास्पद! चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर यांची 'या' आंतरराष्ट्रीय...

Ashutosh Gowariker : अभिमानास्पद! चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर यांची ‘या’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई | Mumbai
जगभरातल्या चित्रपट प्रेमींसाठी मानाचा समजला जाणारा अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आणि मुख्य संरक्षक अंकुशराव कदम यांच्या नेतृत्वाखालील आयोजन समितीने महोत्सवाची माहिती दिली. आयोजक समितीने चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाबाबत सदस्यांची नावे जाहीर केली असून त्यात आशुतोष गोवारीकर आणि सुनील सुकथनकर या नामवंतांचा समावेश आहे.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशनच्या वतीने सदरील महोत्सव केंद्र सरकारचे सूचना व प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी व महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहकार्याने संपन्न झाला. यावर्षी महोत्सवाचे दहावे वर्ष असणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे १५ ते १९ जानेवारी २०२५ पर्यंत हा महोत्सव होणार असून अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समितीने या महोत्सवाची रुपरेषा सांगितली आहे. यात आशुतोष गोवारीकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

मागील २५ ते ३० वर्षांपासून भारतीय सिनेमाचे जगभरात उल्लेखनीय नाव होण्यात गोवारीकरांचा मोठा सहभाग आहे. गोवारीकर यांनी आपल्या अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती प्रक्रीयेने भारतीय चित्रपटसृष्टीत मागील तीन दशकांपासून भक्कम योगदान दिले आहे. आशुतोष गोवारीकर यांनी लगान, स्वदेश, जोधा अकबर, पानिपत अशा ऑस्कर नामांकीत सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातील हे मोठे नाव आहे. भारातीय सिनेमा ऑस्करपर्यंत पोहोचवणारे हे प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते आहेत.

महोत्सवाच्या नव्या संयोजन समितीची घोषणा महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम यांनी या पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. महोत्सवाच्या संयोजन समितीच्या मानद अध्यक्षपदी भारतीय सिनेमा ऑस्करपर्यंत पोहचविणारे प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक व निर्माते आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली असून महोत्सवाच्या संचालकपदी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते सुनील सुकथनकर हे देखील या आवृत्तीसाठी महोत्सव संचालक म्हणून काम पाहतील. सुकथनकर यांनी गेल्या ३० वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या