रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचा सामाजिक उपक्रम
नाशिक : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक आणि फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक अंध दिनाच्या निमित्ताने दिव्यांगासाठी भव्य जिल्हास्तरीय स्पर्धा ‘झेप 2020’ घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील 31 शाळांचे सुमारे 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी रोटे. रमेश मेहेर यांनी अध्यक्षपद भूषविले, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीचे डीन संजय जरात, एन्कलेव्ह चेअर रोटे. गुरमीत रावल, रोटे. आशा वेणूगोपाल, जिल्हा समाजकल्याण अधिकारी रविंद्र परदेशी उपस्थित होते.
यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ ने झेपच्या माध्यमातून स्पर्धा घेत आहे. यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून भविष्यात त्यांना खूप मदत होणार असल्याचे अध्यक्ष मेहेर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी परदेशी यांनी दिव्यांग मुलांना सरकारकडून मदत मिळवून देण्याचेही आश्वासन दिले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे अध्यक्ष गाडेकर यांनी क्लब मार्फत सुरु असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सोबतच या स्पर्धा दरवर्षी घेण्यात येईल असे जाहीर केले. रोटेरिअन मंगेश जाधव यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन रोटे. अश्विनी जोशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशासाठी रोटे. डॉ. मंगेश जाधव, रोटे. उमेश राठोड, रोटे. नाना शेवाळे, रोटे. प्रमोद साखरे, रोटे. जयंत भिंगे, रोटे. निखिल खोत, रोटे. मनिष ओबेरॉय, रोटे. प्रशांत सारडा, रोटे. गीता पिंगळे, रोटे. विवेक आंबेकर, रोटे. परेश महाजन, रोटे. राजेंद्र धारणकर, रोटे. रुपेश झटकारे, रोटे. केवल सोमैय्या तसेच सर्व रोटरी सदस्यांनी मेहनत घेतली.
स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ नासिक नॉर्थ तर्फे मेडल, व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेनंतर दिव्यांग मुलांना गिफ्ट व खाऊचे पॅकेट देऊन निरोप देण्यात आला.