Monday, January 26, 2026
Homeनगरखळबळजनक! घरात घुसून अपंग महिलेचा निर्घृण खून

खळबळजनक! घरात घुसून अपंग महिलेचा निर्घृण खून

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

बोल्हेगाव उपनगरातील कौस्तुभ कॉलनी परिसरात दिवसा घरात घुसून एका अपंग महिलेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने हनुवटी व गळ्यावर वार केले आहे.

- Advertisement -

मनिषा बाळासाहेब शिंदे (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती बाळासाहेब साहेबराव शिंदे (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिषा शिंदे या पती बाळासाहेब शिंदे व मुलगा अनिकेत यांच्यासोबत शनी मंदिराजवळ, कौस्तुभ कॉलनी, भारत बेकरी रोड, बोल्हेगाव येथे वास्तव्यास होत्या. त्या अपंग असल्याने घराबाहेर क्वचितच जात असत.

YouTube video player

फिर्यादी बाळासाहेब शिंदे यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी (१२ डिसेंबर) पहाटे पत्नीने त्यांना व मुलाला चहा दिल्यानंतर ते दोघे नातेवाइकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यात विंचूर येथे रवाना झाले होते. सकाळी सुमारे ६.४५ वाजता घरातून निघाल्यानंतर दुपारी कार्यक्रमास हजेरी लावून ते संध्याकाळपर्यंत बाहेरगावीच होते. सायंकाळी सुमारे ६.३० वाजता पत्नी मनिषा यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नातेवाईकांनाही संपर्क न झाल्याने शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्यास सांगण्यात आले.

शेजाऱ्यांनी घर उघडून पाहिले असता हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मनिषा शिंदे पडलेल्या दिसून आल्या. ही माहिती मिळताच कुटुंबीयांनी तत्काळ अहिल्यानगरकडे धाव घेतली. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय घरी पोहोचले असता घरात मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले, तसेच घटनास्थळी चाकू व ब्लेड आढळून आले. मनिषा शिंदे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहाच्या तपासणीत हनुवटी व गळ्यावर गंभीर कापलेल्या जखमा आढळून आल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेबाबत बाळासाहेब शिंदे यांनी पोलीस ठाण्यात शनिवारी (१३ डिसेंबर) पहाटे फिर्याद दिली असून, शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या कालावधीत अज्ञात इसमाने घरात घुसून धारदार शस्त्राने खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांचे जबाब व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Shrirampur : पतीचा गळा आवळून खून; दत्तनगरची खळबळजनक घटना

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर येथील दत्तनगरमध्ये पत्नीने पतीच्या डोक्यात लाकुड मारत गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदर महिलेचा पती हा दारु पिवुन...