Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशMorocco Earthquake: विनाशकारी भूकंपाचा देशात हाहाकार; आत्तापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू,...

Morocco Earthquake: विनाशकारी भूकंपाचा देशात हाहाकार; आत्तापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी

मोराक्को | Morocco

आफ्रिकेतील अत्यंत महत्त्वाच देश असलेल्या मोरोक्कोत (Morocco Earthquake) शुक्रवारी रात्री भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ एवढी मोजल्या गेली. हा महाभीषण भूकंप होता. भूकंपात अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाले. त्यामुळे रात्री गाढ झोपेत असलेले नागरिक झोपेतच गाडले गेले. या विनाशकारी भूकंपाने देशात हाहाकार उडाला आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोरोक्को देशात सर्वात शक्तिशाली विनाशकारी भूकंपाने हाहाकार माजवला आहे. या भूकंपात शेकडो घरे कोसळली असून आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, देशाच्या गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

जी-२० परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत उपस्थिती; मोदींचे कौतुक ते ऋषी सुनक यांच्यासोबतच्या फोटोची चर्चा

अख्खा दिवस गेला, रात्र सरली तरी मृतदेह निघायचे थांबत नाहीये. मृत्यूचे असे तांडव कधीही कुणी पाहिले नव्हते, इतके भयानक दृश्य सध्या मोरोक्कोत झाले आहे. एखाद्या भीतीदायक भागासारखा मोरोक्कोतील प्रत्येक भाग दिसत आहे.

या शक्तिशाली भूकंपाने आत्तापर्यंत २,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास २,००० नागरिक जखमी झाले आहेत, जखमींपैकी १,४०४ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. इमारतींखाली तसेच मलब्याखाली अद्यापही अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात असून सध्या बचावकार्य सुरू आहे.

Video : नैताळेत आमरण उपोषणास सुरुवात; छत्रपती संभाजीराजेंनी दिली उपोषणस्थळी भेट

भूकंपात कुणाचा मुलगा गेलाय, कुणाचा बाप, कुणाची आई, तर कुणाचे आजीआजोबा. मोरोक्कोतील प्रत्येक चेहऱ्यावर उदासपण आहे. लोक धायमोकलून रडत आहेत. त्यांचे अश्रूच थांबताना दिसत नाहीये. सांत्वन करावे तर कुणाचे करावे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण प्रत्येकाच्या घरातील कोण ना कोण या भूकंपाने हिरावून घेतला आहे. मोरोक्कोत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. देशात तीन दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या