Monday, November 25, 2024
Homeनाशिककेळझर धरण तुडुंब

केळझर धरण तुडुंब

आरम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

- Advertisement -

डांगसौंदाणे | प्रतिनिधी Dangsoundane

572 दलघफु क्षमता असलेले केळझर(गोपाळसागर)धरण आज सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान पूर्ण क्षमतेने भरले आहे .धरणाच्या सांडव्यावरून 75 क्यूसेक पाण्याचा विसर्ग आरम नदीपात्रात सुरू झाला आहे

धरण क्षेत्रात गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार मुळे आज सायंकाळी धरणाच्या सांडव्यावरून आरम नदी पत्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे आरम खोऱ्यातील 25 ते 30 गावांसह सटाणा शहराला पाणी टंचाई पासून दिलासा देणारे हे धरण भरल्याने शेतकरी, व परिसरसतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

गत वर्षी 7 ऑगष्ट ला भरलेलं हे धरण याही वर्षी ऑगस्ट च्या सुरवातीला दोन दिवस सुरू असलेल्या संततधारेमुळे धरण भरले आहे धरण भरल्याने आगामी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या असुन आगामी काळात जर पाऊस असाच सुरु राहिला तर आरमनदी ला पुर येण्याची शक्यता असून नदीकाठवरील गावांना ही प्रशासनातर्फे सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.

धरणातुन आज रोजी 75 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे हा विसर्ग वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाचे अधिकारी सी.पी खैरनार यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या