Sunday, September 8, 2024
HomeUncategorizedनांदुरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग

नांदुरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग

म्हाळसाकोरे। कृष्णा अष्टेकर Mhalsakore/ Nandurmadhyameshwar

- Advertisement -

नाशिक जिल्ह्याच्या वरील (पश्चिम) भागाच्या धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतीक्षेनंतर सुरु असलेल्या पावसामुळे वरील दारणा व इतर धरणामध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याने दारणा नदीतून विसर्ग होत असल्याने निफाडच्या नांदुरमध्यमेश्वर धरणातून गुरुवार (दि.25) 8804 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

आज रोजी दारणा धरण व नदीकडील क्षेत्रावरती रात्रीपासून पाऊस बरसत असल्याने नांदुरमध्यमेश्वर धरणातून 8804 क्यूसेक इतका विसर्ग दुपारपर्यंत सुरु होता. दुपारनंतर कडवा धरणातून दोनशे इतका विसर्ग तर दारणा धरणातून अधिकचा तीन हजार पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नांदुरमध्यमेश्वर दरवाजामधून 12 हजार 4 क्यूसेक इतका विसर्ग दुपारी 4 वाजेनंतर करण्यात आला होता. वरील धरण क्षेत्रात पाऊस वाढला तर अतिरिक्त विसर्ग नांदुरमध्यमेश्वर धरणातून वाढवण्यात येवू शकतो, अशी माहिती धरण क्षेत्र शाखा अधिकार्‍यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या वरील धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने नांदुरमध्यमेश्वर धरणामध्ये पाणी पातळीची वाढ झाली आहे. त्यामुळे नांदुरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वरील क्षेत्रात पाऊस अधिक पडला तर नांदुरमध्यमेश्वर धरणातून अधिकचा विसर्ग सुरू करावा लागेल.
शरद नागरे, धरण शाखा अधिकारी, नांदुरमध्यमेश्वर

- Advertisment -

ताज्या बातम्या